नागपूर,
Vishwakarma Nagar Nagpur विश्वकर्मा नगर येथे रविवारी विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झाले. येथील श्री माँ तुळजाभवानी देवस्थान परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाअंतर्गत ५ ते १५ वयोगटातील मुलामुलींसाठी चित्रकला, बौद्धिक व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना वस्तीतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी श्रीसूक्त पठणाची १६ आवर्तने घेतली. संध्याकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी शिवकालीन क्रीडांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.या संमेलनात ध्वजपूजन, भारतमाता पूजन, गोमाता पूजन तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. उद्घाटन व पूजन डॉ. आनंदवर्धन दास (इस्कॉन मंदिर), मंगेश टोळ (कुटुंब प्रबोधन संयोजक) व नगरसेविका . रूपाली ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्वागत गीत . देवयानी आंबुलकर यांनी सादर केले.कार्यक्रमाला नगरसेविका . सानवी तुरडकर (शेंडे), नगरसेवक मनोज साबळे व रितेश पांडे उपस्थित होते.
आपल्या आशीर्वचनात डॉ. आनंदवर्धन दास यांनी “मंदिर व गुरुकुल ही हिंदूंचे ऊर्जा स्थान असून येथून नागरिकांना कर्तव्याची दिशा मिळते,” असे सांगितले.Vishwakarma Nagar Nagpur मंगेश टोळ यांनी पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून स्वदेशी, सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन व नागरिक कर्तव्ये यांविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, जयपाल गहेरवार, मोहन आंबुलकर, डॉ. देवानंद गिरडकर, विश्वास आग्रे, शिरीष सुरकार, रवींद्र नक्षणे, चैतन्य खोंड, विलास गायकी, विजय मानेकर, अक्षय जवाजी, पुष्पा बीसेन,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत भालेराव यांनी केले, तर आभारप्रदर्शन अरुण शास्त्रकार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाआरती व महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.
सौजन्य श्रीकांत भालेराव ,संपर्क मित्र