नागपूर,
World Theatre Day आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या भाषा विभागातर्फे सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी ‘जागतिक रंगभूमी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील गाजलेल्या नाटकांमधील निवडक प्रवेश सादर केले. ‘कुमारसंभव’, ‘एकच प्याला’, ‘आषाढ का एक दिन’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ तसेच ‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकांतील सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. मृणाल वाकलकर, रितिक मिश्रा, भाव्या बाली, खुशबू, युतिका शेवाते, ऐश्वर्या टेकाडे, विश्वा देशमुख, चिन्मय कागभट, समीर सोनपिंपले, रोहिणी वासनिक, विक्रांत गुरनुले, टेनिषा हिंगवे आणि प्राणेश्वरी कापसे या विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय सादर केला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून न्यु इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूरच्या माजी मुख्याध्यापिका ऋचा अनसिंगकर उपस्थित होत्या. World Theatre Day त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना स्वतःचे अनुभव कथन केले आणि कलाकार होण्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला.उपप्राचार्या व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी भाषेचे संवादातील महत्त्व अधोरेखित केले. विविध विभागांतील प्राध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आरती देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. लविना केसवानी यांनी केले.
सौजन्य:दीपलक्ष्मी भट,संपर्क मित्र