सोमलवाडा भागातील सकल हिंदू समाज संमेलन थाटात

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Somalwada सोमलवाडा भागातील सुरेंद्रनगर वस्ती येथे सकल हिंदू समाज संमेलन आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम राधाकृष्ण मंदिर, नासा ग्राउंड येथे हिंदू संमेलन आयोजन समितीद्वारे संपन्न झाला.

Somalwada 
 
संमेलनाच्या निमित्ताने २६ फेब्रुवारीपासून चार दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पाककला, महिलांसाठी रांगोळी, मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धांचा समावेश होता. या उपक्रमांचा उद्देश हिंदू समाजाला एकत्र आणणे आणि समुदायाची एकात्मता वाढवणे होता. Somalwada सर्व स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीने सुरळीत पार पडल्या.
 
स्पर्धा समिती सदस्य:
सविता जोशी, राधिका जलताडे, अंजली बर्डे, धनश्री देव, संगीता गायकवाड, चंद्रकांत मगरे
 
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र