आमगावात पर्यावरणपूरक होळीचा आदर्श

- ५१०० शेणाच्या गोवर्‍यांपासून साकारली होळी; वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
आमगाव,
eco friendly holi संपूर्ण देशभर होळी दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जातो. परिणामी वृक्षतोड वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडतो. तसेच धूर आणि प्रदूषणामुळे वातावरणावरही विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर आमगाव शहरात एक पर्यावरणपूरक आणि अनुकरणीय उपक्रम राबविण्यात आला. अजय खेतान मित्रपरिवार यांच्या पुढाकारातून यंदा होळी गायीच्या शेणाच्या गोवर्‍यांपासून तयार करण्यात आली. या होळीसाठी एकूण ५ हजार १०० शेणाच्या गोवर्‍यांचा वापर करण्यात आला.
 

holi 
 
 
पारंपरिक लाकडांऐवजी शेणाच्या गोवर्‍यांचा वापर केल्यामुळे वृक्षतोड टाळण्यास मदत होते तसेच प्रदूषणही तुलनेने कमी प्रमाणात होते. या उपक्रमामागे पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सण साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने शक्य तितक्या पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.eco friendly holi या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी या प्रयत्नाचे कौतुक करत भविष्यात अशा पद्धतीचे उपक्रम अधिक प्रमाणात राबविण्याची गरज व्यक्त केली. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने छोटासा का होईना, पण सकारात्मक बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.