‘आया शेर’च्या हिंदी आवृत्तीची धमाकेदार एन्ट्री

‘द पैराडाइज’ला नवे बळ

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
मुंबई
Aya Sher Hindi version release अभिनेता नानीच्या वाढदिवसानिमित्त तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेले ‘आया शेर’ हे गाणे प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले असून यंदाच्या वर्षातील सर्वात मोठे हिट अँथम म्हणून त्याची चर्चा रंगली आहे. तेलुगू आवृत्तीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या गाण्याचे हिंदी व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. चाहत्यांच्या मागणीनुसार सादर करण्यात आलेल्या या नव्या आवृत्तीमुळे चित्रपटाच्या प्रमोशनला नवे बळ मिळाले आहे.
 

Aya Sher Hindi version release 
The Paradise या चित्रपटातील ‘आया शेर’ म्हणजेच “शेर आला” ही ओळच गाण्याची ऊर्जा आणि दमदार अंदाज स्पष्ट करते. पॉवर-पॅक बीट्स, आक्रमक सादरीकरण आणि नानीची इंटेन्स स्क्रीन प्रेझेन्स यामुळे हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेलुगू आवृत्तीने यूट्यूब चार्ट्सवर अव्वल स्थान पटकावत ४४ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळवले आहेत. सध्या हे गाणे ट्रेंडिंगमध्ये अग्रस्थानी असून जगभरातील चाहते इन्स्टाग्रामवर नानीच्या एनर्जेटिक हुक स्टेपची नक्कल करत रील्स शेअर करत आहेत.
 
 
चित्रपटात नानीसाठी हे Aya Sher Hindi version release  दमदार इंट्रोडक्शन सॉंग ठरले आहे. या गाण्याला Anirudh Ravichander यांनी संगीत दिले असून त्यांचे जोशपूर्ण आणि आधुनिक धाटणीचे संगीत गाण्याला वेगळीच उंची देते. कोरिओग्राफी सुधान मास्टर यांनी केली असून रॉ एनर्जी आणि स्टायलिश मूव्ह्समुळे थिएटरमध्येही या गाण्यावर चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गायक अरजुन चांडी यांच्या आवाजाने ट्रॅकला अधिक ताकद मिळाली आहे.‘द पैराडाइज’ हा दिग्दर्शक Srikanth Odela यांचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांच्या पदार्पणाच्या Dasara या चित्रपटाला मोठी प्रशंसा मिळाली होती. त्यामुळे ‘द पैराडाइज’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.SLV सिनेमाजच्या निर्मितीत साकारलेला हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी आठ भाषांमध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. प्रभावी दिग्दर्शन, दमदार अभिनय आणि वर्षातील सर्वात मोठ्या म्युझिकल हिटचा आधार यामुळे ‘द पैराडाइज’ एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरेल, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत रंगू लागली आहे. तेलुगूमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘आया शेर’चे हिंदी व्हर्जनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.