माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…

धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
मुंबई
Ayesha Khan  चित्रपटसृष्टीत यशस्वी वाटचाल करत असलेल्या अभिनेत्री आयशा खानने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत धक्कादायक अनुभव सार्वजनिकपणे मांडले आहेत. सार्वजनिक जीवनात आणि महिला सेलिब्रिटी म्हणून वावरताना दररोज लैंगिक छळ, अश्लील संदेश आणि अगदी लैंगिक अत्याचाराच्या धमक्यांनाही सामोरे जावे लागते, असा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
 

Ayesha Khan  
अलीकडेच Kis Kisko Pyaar Karoon 2 आणि Dhurandhar या चित्रपटांमध्ये तसेच ‘शरारत’ या गाण्यात झळकलेली आयशा सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगपासून ते प्रत्यक्ष सेटवर घडलेल्या त्रासदायक प्रसंगांपर्यंत अनेक अनुभव उघड केले.
 
 
‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या Ayesha Khan  मुलाखतीत आयशाला विशिष्ट सौंदर्य निकषांमध्ये बसण्याचा दबाव जाणवतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तिने आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र सोशल मीडियावरील वातावरण अत्यंत विषारी असल्याचे ती म्हणाली. “इन्स्टाग्रामवर जवळपास दररोज माझ्या शरीराचे लैंगिकीकरण केले जाते. मी साधा टॉप घातला तरी लोकांना त्यात समस्या दिसते. स्कर्ट परिधान केला तरी टीका होते. त्यामुळे काहीही पोस्ट करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागतो. इतर कोणी माझे लैंगिकीकरण करेल या भीतीने मला काय घालायचे किंवा काय पोस्ट करायचे याचा विचार करावा लागतो, ही अत्यंत दु:खद बाब आहे,” असे ती म्हणाली.आयशाने कास्टिंग काउच आणि रिजेक्शनचाही अनुभव घेतल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर तिला सोशल मीडियावर वारंवार लैंगिक अत्याचाराच्या धमक्या मिळाल्याचेही तिने स्पष्ट केले. “हो, दररोज अशा प्रकारचे मेसेज येतात. मी आत्ताच फोन उघडून दाखवू शकते. हे इतके सामान्य झाले आहे की प्रत्येक मुलाखतीत ट्रोल्स उपस्थित असतात. या गोष्टींवर ठोस कारवाई होत नाही. ही नवीन समस्या नाही, शतकानुशतके चालत आलेली आहे,” असे ती म्हणाली.
 
 
याच दरम्यान तिने एका Ayesha Khan  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला धक्कादायक प्रसंगही सांगितला. त्या दिवशी तिचे वडील सेटवर उपस्थित होते. सहज म्हणून तिने इन्स्टाग्राम उघडले असता काही दिवसांपासून येत असलेल्या संदेशांमध्ये व्हॉइस नोट्स असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर त्या संदेशांचा संबंध सेटवरील एका स्पॉटबॉयशी असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली आणि तिने तात्काळ वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर तिला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे आयशाने सांगितले.महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आयशाने मोकळेपणाने व्यक्त होत उद्योगातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. तिच्या या खुलाशांमुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि महिलांवरील वाढत्या ऑनलाइन छळाच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.