जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

*अभियानाचा शुभारंभ ७ मार्चपासून मंडळस्तरावर सेवा

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
बुलढाणा,
buldhana-news : महसूल विभागाच्या सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचविण्यासाठी व प्रलंबित प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार टप्पा क्र. १ अंतर्गत हे शिबिर ७ मार्च पासून जिल्ह्यातील सर्व तालुयांमध्ये मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दि. ४ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
 
bul
 
 
 
अभियानाचा मुख्य उद्देश या महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा आहे. शेतकर्‍यांचे प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, वारस नोंदी मंजुरी तसेच महसूल विषयक नव्या सुधारणा याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. छत्रपती_ शिवाजी_ महाराज _महाराजस्व ८ मार्च रोजी चिखली तालुयातील अमडापूर येथे विशेष भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिरही पार पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना महसूल सेवा तसेच मोफत कायदेशीर सल्ला व इतर शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.
 
 
छत्रपती_शिवाजी_महाराज_महाराजस्वशिबिरामध्ये महसूल व भूमी अभिलेख विभागाकडून फेरफार अदालतीद्वारे प्रलंबित वारस नोंदी मंजुरी, यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ व ८अ उतार्‍यांचे वितरण, सातबारा दुरुस्ती, उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे वितरण, तक्रार निवारण आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच तुकडेबंदी कायदा, अकृषक परवाना रद्द, पोटहिस्सा मोजणी, मुख्यमंत्री बळीराजा पावसंद रस्ते योजना, शेतरस्ते मोहीम यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण विकास विभागामार्फत पीएम किसान योजनेत नवीन नोंदणी, ई-केवायसी, ‘लँड सीडिंग’, अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत ‘फार्मर आयडी’ निर्मिती तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू मंजुरीसंदर्भात प्रक्रिया केली जाणार आहे. सामाजिक व आरोग्य विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, इतर पेन्शन योजनांचे अर्ज व ई-केवायसी, आयुष्मान भारत व आभा कार्ड वितरण, नवीन रेशन कार्ड अर्ज व दुरुस्ती तसेच दिव्यांगांसाठी यूडीआयडी कार्ड सेवा उपलब्ध राहणार आहे.
 
 
छत्रपती_शिवाजी_महाराज_महाराजस्व७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल तसेच ८ व १५ मे २०२६ रोजी विविध मंडळ व नगर परिषद स्तरावर शिबिरे घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव व नागरिकांनी आपल्या जवळच्या महसूल मंडळ स्तरावरील या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.