धुलीवंदन महोत्सवात बालकीर्तन

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Dhulivandan Festival श्रीगुरूदेव सेवा मंडळ, विश्वकर्मा नगर द्वारा आयोजित धुलीवंदन महोत्सवात सम्यक छाया रवी मानव या बालप्रबोधनकाराने कीर्तन सादर केले. या कीर्तनास कृष्णा पटवा यांनी हार्मोनीयमच्या माध्यमातून साथ दिली.
 
nagpur
 
कीर्तन सादरीकरणानंतर अन्मय मृन्मयी अनंता रक्षक या बालविद्वानाच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला. अन्मय यांचा सन्मान त्यांचे काका कुमार कबीर रक्षक यांनी केला. Dhulivandan Festival कार्यक्रमाचे उद्देश बाल मनावर सुं-संस्कार निर्माण करणे आणि लहान वयातच संस्कारांचे बीज रोपणे हे होते. आयोजकांचे म्हणणे आहे की, अशा लहान प्रयत्नांमुळे उद्याचा युवाभारत संस्कारपूर्ण घडेल.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र