पंसतच ठेकेदाराला दे बत्ती

*पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
contractor-beaten-up : कारंजा (घा.) तालुयातील पारडी येथील बांधकाम ठेकेदार केशव जुनघरे हा पंचायत समिती कारंजा येथील मनरेगा कार्यालयात आपल्या थकीत बिलाची माहिती घेण्यासाठी आला असता त्याच गावातील पाच जणांनी ठेकेदार व त्याच्या मुलाला मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
jkl
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील, विश्वभूषण विनोद पाटील, नितीन बबुलकर, निलेश कंगाली, मंगेश डबले रा. पारडी हे पंचायत समिती कार्यालयात असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास ठेकेदार केशव जुनघरे व त्याचा मुलगा पंसत रस्त्याच्या बांधकामाचे थकित बिलाच्या पैशाबाबत विचारपूस करण्याकरिता आला. विचारपूस करीत असताना पाच जणांनी केशव जुनघरे व त्यांचा मुलगा यांना मारहाण केली. त्यानंतर पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून त्यांचा वाद सोडविला. या घटनेची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी फोन करून ठाणेदार प्रल्हाद मदन यांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सतीश जायभाये, पोलिस शिपाई आशिष कालोकर, दिनेश घसाड घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी केशव जुनघरे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.