हावरापेठमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Hawarapeth हावरापेठ येथील हनुमान मंदिर प्रांगणात होळीचा सण पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. “एक वस्ती, एक होळी” या संदेशासह होळी साजरी केली गेली. पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत, तोरणे आणि पताका बांधून परिसराची स्वच्छता करण्यात आली. केरकचरा गोळा करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश टाळत पर्यावरणपूरक होळीका दहन करण्यात आले.
 
holi
 
जगदिश गावंडे यांनी होळी देवतेला प्रदक्षिणा देऊन होळीचे पूजन केले. पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून आरती केली गेली आणि गाठीचा प्रसाद उपस्थितांना वाटला. Hawarapeth गुलालाचा टिका लावून सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. शेवटी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी राजू इटनकर, दिनेश बांगडे, मंगेश मोरे, नारायण गायकवाड, रमेश मेहर, संजय उईके, दिलीप इटनकर, मोरेश्वर बांगडे, शिवम् इटनकर यांसह अनेक तरुण मित्रमंडळी उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र