गोल्डन पार्कने घेतला मोकळा ‘श्वास’

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
golden-park : येथील सुन्नी मशिदीच्या मागे असलेल्या गोल्डन पार्कमधील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढले होते. या ठिकाणी काही तरुणांनी नियमित दारूचा अड्डाच बनविला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर नगरसेवक जावेद अन्सारी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून गोल्डन पार्कमधील झुडपे तोडून हा पार्क स्वच्छ करून घेतला.
 
 

y4March-Jawed-Ansari 
 
 
 
या गोल्डन पार्कमधील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढली होती. याचाच फायदा घेऊन काही तरुण या झुडपांच्या मागे लपून दारू पीत, गांजा ओढत त्याचबरोबर जुगारसुद्धा खेळत. ही बाब नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नगर परिषदेकडे ही झुडपे तोडण्याासाठी पाठपुरावा केला. नप प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने ही झुडपे तोडली.
तसेच या परिसरात गांजा ओढण्यात येत असल्याने नगरसेवक जावेद अन्सारी यांनी अवधूतवाडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्वरित यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी या भागात गस्त वाढविण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
नागरिकांनी मानले आभार
 
 
गोल्डन पार्क संकुलात झुडपे वाढल्याने या ठिकाणी अवैध धंदे सुरू होते. संकुलाची साफ-सफाई झाल्याने नागरिकांनी नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके तसेच उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी व नगरसेवक जावेद अन्सारी यांचे आभार मानले आहेत.