तभा वृत्तसेवा
मुंबई,
illegal drug sale Pune, नियमांचे उल्लंघन करून नशेसाठी वापरल्या जाणाèया औषधी गोळ्यांची विक्री करणाèया मेडिकल दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशी ठाम घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली.
पुण्यातील प्रकरणावर चित्रा वाघ यांचा तारांकित प्रश्न
विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करताना सदस्या चित्रा वाघ यांनी पुण्यातील नशेच्या गोळ्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पुणे पोलिसांनी समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा या आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून मनोरुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाèया 6 हजार 900 औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅ म्प आणि येरवडा परिसरात या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या 1 रुपयाला उपलब्ध असलेली गोळी काळ्या बाजारात 50 ते 60 रुपयांना विकली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या मेडिकल स्टोअर्समधून बाहेर कशा येतात, हा गंभीर प्रश्न उपस्थित करत अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाèयांवरही कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली.
यावर उत्तर illegal drug sale Pune देताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, पुणे येथील प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशातील सी.बी. हेल्थ केअरकडून गुजरातमधील बिनोक्स हेल्थ केअरकडे वितरणासाठी आलेल्या गोळ्या कुरिअरद्वारे अवैधपणे विक्रीस काढण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुणे शहरात अशा औषधांचे उत्पादन करणारी कोणतीही अनधिकृत आस्थापना आढळलेली नाही. सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.