“माझ्या मुलाला भारतात घेऊन या साहेब”

लेकासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारची शासनाला विनंती

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
मुंबई
Vishakha Subhedar appeal मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलमधील तणावपूर्ण परिस्थितीचे परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहेत. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेत्री Vishakha Subhedar यांच्या कुटुंबावर संकट ओढावले आहे. त्यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा कुवेतमध्ये अडकून पडला असून गेल्या चार दिवसांपासून भारतात परतण्याचा मार्ग मिळत नसल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे दिली आहे.
 
Iran Israel conflict, Iran‑Israel tension, Vishakha Subhedar appeal
 
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनय सुभेदार हा पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला होता. प्रवासादरम्यान कुवेतमध्ये त्याचा ‘ले-ओव्हर’ होता. मात्र, इराण-इस्रायल संघर्षामुळे मध्यपूर्वेतील एअरस्पेस काही काळासाठी बंद करण्यात आली आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. परिणामी अभिनय कुवेतमध्येच अडकून पडला. सध्या एअरलाईन्सकडून त्याच्या राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासानेही प्राथमिक मदत केल्याचे विशाखा यांनी सांगितले आहे.तथापि, तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने विशाखा सुभेदार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी पंतप्रधान Narendra Modi तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांना कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. “ज्याप्रमाणे दुबईतील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणले जात आहे, तसेच कुवेतमध्ये अडकलेल्या माझ्या मुलासह इतर नागरिकांसाठीही तातडीने पावले उचलावीत,” असे त्यांनी म्हटले आहे.
अभिनय सुभेदार हा Vishakha Subhedar appeal  लंडनमधील प्लायमाउथ येथे ‘एम.ए. इन फिल्म मेकिंग’चे शिक्षण घेण्यासाठी जात होता. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी विशाखा यांना सोशल मीडियावर धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.दरम्यान, इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पातळीवरही अस्थिरता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, तेलपुरवठा आणि विमानवाहतुकीवर त्याचे परिणाम दिसून येत असून अनेक देश सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.