महाराष्ट्र रोव्हर्स रेंजर्सच्या खात्यात राष्ट्रीय चषक

पहिली राष्ट्रीय रोव्हर रेंजर छत्तीसगड येथे संपन्न

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
देवळी (वर्धा),
rovers rangers छत्तीसगड राज्यातील बालोद येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या रोव्हर रेंजर चमूने राष्ट्रीय चषक पटकावले. छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री अरुण साव व शिक्षण मंत्री गजेंद्र यादव यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे रोव्हर स्काऊटचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्राच्या चमुचे प्रमुख कॅप्टन मोहन गुजरकर व गाईड संघटक मंजुषा जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईडचे राष्ट्रीय मुख्य आयुक्त के. के. खंडेलवाल, उपाध्यक्ष तथा कर्नाटकचे माजी गृहमंत्री पी. जी. सिंधीया उपस्थित होते.
 

रोव्हर्स रेंजर्स 
 
 
छत्तीसगड येथे आयोजित या स्पर्धेत देशातील ३ हजार युवक, युवती सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रतून ३०० रोव्हर्स रेंजर्सचा सहभाग होता. महाराष्ट्राची चमु महाराष्ट्र भारत स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुत शितल तेली उगले, राज्य सचिव तथा क्रीडा सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, राज्य संघटन आयुत अरुण सप्ताळे, सह सचिव सारिका बांगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती.
 
विविध स्पर्धा तसेच रेंजर अभ्यासक्रमावर आधारित उपक्रमांची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात स्पर्धा व उपक्रमात रेंजर्स सहभागी होऊन १० स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले करीत राष्ट्रीय स्तरावरील ध्वज प्राप्त केले. जांबोरीत पथसंचलन, लोकनृत्य, कॅम्प क्राफ्ट, कॅम्प फायर यात ‘अ’ श्रेणी तर बिन भांड्यांचा स्वयंपाक, पायोनियरिंग, राज्य गेट, कलर पार्टी, मार्च पास्ट व इथनिक फॅशन शो मध्ये ‘ब’ श्रेणी प्राप्त करून महाराष्ट्राचा गौरव वाढविला.
 
राष्ट्रीय जांभोरीत महाराष्ट्र रोव्हर रेंजरचे चमु कॅप्टन मोहन गुजरकर व संघटक मंजुषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा संघटक नितेश झाडे, गोंदिया जिल्हा संघटक पराग खुजे, नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ, अमरावती जिल्हा संघटक प्रीती गोल्हर, रोव्हर लीडर संतोष तुरक व सीनियर रोव्हर लीडर प्रा. रवींद्र गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोव्हर्स रेंजर्सने विविध उपक्रम व स्पर्धेत सहभागी होऊन प्रावीण्य प्राप्त केले.
 
रोव्हर रेंजरचे नेतृत्व रेंजर लीडर कल्याणी लिखार, आदर्श नाईक, मनोज नेहारे, आदित्य तांगडगे, रोव्हर लीडर ताजने, रितेश बुटे यांनी केले असून वैष्णवी कन्नाके, स्नेहा मडकाम, आरती मरघडे, सत्येश्वरी सावरकर यांच्या नेतृत्वात राज्यातील रोव्हर रेंजर सहभागी झाले होते.rovers rangers यशस्वीतेकरिता यामिनी पारधी, राधिका नागोसे, पूर्वा कापटे, अनुश्री खंडरे, पायल चौके, पंकज पवार, तेजस वाघाडे, भूषण ठोके यांच्यासह रोव्हर्स रेंजर्सनी प्रयत्न केले.