आईच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Memorial Award प्रसिद्ध पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा थाटात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अँड. लखनसिंह कटरे, विशेष अतिथी नाट्यकर्मी रंजन दारव्हेकर, प्रमुख अतिथी श्रीपाद अपराजित, प्रयोजक शंकर जाधव, आणि पद्मगंधा अध्यक्षा प्रभाताई देऊस्कर यांची उपस्थिती होती. यावर्षी नव्याने सुरू झालेल्या “राष्ट्रीय चरित्र लेखन गौरव पुरस्कार” डॉ. भारती सुदामे यांना तर “समीक्षक रत्न गौरव पुरस्कार” डॉ. वि.स. जोग यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.
 
 Memorial Award
 
समारंभात विविध साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात आले. लघुकथा पुरस्कार त्यांच्या आई वसुमती काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्षा विजय देशपांडे, नागपूर यांनी प्रदान केला. Memorial Award यावर्षी हा पुरस्कार प्रतिमा सहस्त्रबुद्धे आणि आसावरी इंगळे यांना विभागण्यात आला. आसावरी इंगळे गुजरातमध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. पुरस्कार देण्यासाठी वर्षा देशपांडे यांना स्टेजवर पाचारण करण्यात आले. मंचावरील मान्यवर आणि वर्षा देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा सहस्त्रबुद्धे यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट यांसह पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र