उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यासोबत धक्कादायक 'कांड'

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
पुणे
woman blackmail case, विवाहविषयक संकेतस्थळावर ओळखीपासून प्रेमजालात अडकवून एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याला नागपूरची महिला फसवून तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपये घेऊन धक्कादायक कांड उघडकीस आले आहे. मुंबईतील ४३ वर्षीय जीएसटी अधिकाऱ्याला या मोहजाळात अडकवून महिलेसह दोन इतर आरोपींनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा केला, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंदवले आहे.
 

woman blackmail case,  
 
 
माहितीनुसार, २०२३ मध्ये अधिकाऱ्याची ओळख मॅट्रिमोनिअल साईटवर नागपूरच्या महिलेशी झाली. सुरुवातीला गोड बोलून विवाहाचे आमिष दाखवत महिलेनं अधिकाऱ्याचा विश्वास जिंकला. नंतर घरगुती आणि वैयक्तिक कारणांची ऑफर देऊन तिने हळूहळू पैसे मागण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्याने वेळोवेळी एकूण ४२ लाख ८७ हजार रुपये महिलेला दिले.
जेव्हा अधिकाऱ्याला woman blackmail case,  संशय वाटला आणि पैशांचा जाब मागितला, तेव्हा महिलेनं आपल्या साथीदारांसह त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. "बलात्काराची खोटी फिर्याद देऊन तुला आयुष्यभर तुरुंगात सडवू," अशी धमकी देऊन पुन्हा ७ लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. सततच्या मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर अधिकाऱ्याने पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. उच्चपदस्थ अधिकारी अशा प्रकारच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला असून, "अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहावे," असे आवाहन केले आहे.या प्रकरणामुळे विवाहविषयक संकेतस्थळांचा योग्य वापर आणि ऑनलाइन ओळखीच्या धोख्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे.