कोरेगाव पार्कमधील होळी कार्यक्रमात लाइटचा गर्डर पडून १५-१६ जण जखमी

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
पुणे
Pune Holi accident, पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये होळीच्या कार्यक्रमात अचानक लाइटचा गर्डर पडून १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
 

Pune Holi accident, Koregaon Park Mundhwa Road, 
महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात आहे. पुण्यातही कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर एका खासगी कंपनीतर्फे होळीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एक हजाराहून अधिक तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती.Pune Holi accident, अचानक या कार्यक्रमात लाइटचा गर्डर कोसळल्याने १५ ते १६ जण जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमींमध्ये तरुण तरुणींचा समावेश आहे. यापैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अद्याप पोलिसांनी या दुर्घटनेसंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही, तसेच गर्डर कोसळण्याचे कारण तपासले जात आहे. घटनास्थळी पोलिस व बचावकर्मचारी तैनात असून जखमींच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.