अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास सश्रम कारावास

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
rape-of-minor-girl : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व लादणारा नराधम मोहम्द अयान शेख मतीन शेख (२७) रा. आंबेडकरनगर, देवळी याला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावण्यात आला. हा निर्वाळा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरित सत्र न्यायाधीश सतीश अडके यांनी दिला.
 

jh k
 
 
पीडितेचे २०१९ मध्ये आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातच ती गर्भवती होती. त्यावेळी पीडिता १६ वर्षांची होती. याबाबत पीडिताने आरोपीस सांगितले. पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. यानंतर रामनगर ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणात पीडितेला जे बाळ झाले. त्या बाळाचे वडील आरोपी असल्याचे डी.एन.ए. रिपोर्ट नुसार निष्पन्न झाले. सरकारतर्फे अतिरीत सरकारी वकील विनय घुडे यांनी काम पाहिले.