नागपूर,
Saraswati Vidyalaya तमिळ भाषिक अल्पसंख्याक संस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या सरस्वती विद्यालयाचा १३२ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात तमिळ प्रार्थना गीताने झाली. प्रमुख पाहुणे म्हणूनवेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चे जनरल मॅनेजर व विधी विभागप्रमुख आर. श्रीराम उपस्थित होते. त्यांचा सत्कारसाउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष टी. के. वेंकटेश यांच्या हस्ते करण्यात आला.

संस्थापक स्व. ए. वासुदेव मुदलियार यांच्या कार्याचा आढावा PPT द्वारे मांडण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालय, संजीवनी स्कूल (विशेष विद्यार्थ्यांसाठी), प्रशिक्षण केंद्र व निरंजन स्कूल ऑफ एक्सलन्स ऑफ आर्ट्स या उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, ‘आदिगुरु शंकराचार्य’ या विषयावरील देखावा, तमिळ नाटक, संजीवनी विद्यार्थ्यांचे लघुनाट्य तसेच संगीत-नृत्य सादरीकरण यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. Saraswati Vidyalaya प्रमुख पाहुण्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसह संस्कारमूल्य जपणाऱ्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष टी. के. वेंकटेश यांनी शिक्षणाद्वारे समाजसेवेच्या वाटचालीचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवानी व्ही. व हेमा नायडू यांनी केले. समारोप ‘वंदे मातरम्’ने झाला.
सौजन्य: अनघा पेंडके, संपर्क मित्र