नारी शक्ती अध्यात्मिक शक्तीचे प्रतीक : सीमा पांढरकर

* हिंगणघाट येथे विशाल हिंदू संमेलन

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट, 
seema-pandharkar : स्त्री ही सृजनशील आहे जगाचे पालन व नेतृत्व करणारी आहे. ती केवळ कुटुंबापुरती मर्यादित नाही तर कुटुंब, समाज, गाव, राष्ट्र या सर्वांना उन्नत करणारी जगन्माता आहे. हिंदू संस्कृतीत तीला मानाचे स्थान आहे. नारी शक्ती ही संपूर्ण ब्रह्यांड ऊर्जेच अध्यात्मिक प्रतीक असल्याचे प्रतिपादन वर्धा येथील वत्या सीमा पांढरकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्धी वर्षानिमित्त गोमाजी वस्ती येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी विवेक विचार मंच विदर्भ प्रांत संयोजक अतुल शेंडे, व्यासपिठावर संत गोमाजी महाराज मठाच्या व्यवस्थापक तारा बगमारे उपस्थित होत्या.
 
 
 
seema
 
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, कुठल्याही समाजाचा विकास हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. परिवर्तनाचा विचार समाजात जागृत होतो तेव्हा तिच्या शतीचे जागरण होते. राणी लक्ष्मीबाईंनी हातात तलवार उचलली ती भारताची अस्मिता जागविण्यासाठी, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलीत केली ती समाजाला अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी. स्त्रियांनी शिकून केवळ शिक्षित न होता संस्कारीत पिढी घडवावी असे आवाहन त्यांनी केले. स्त्रिया आज देशात निर्णायक भूमिका बजावीत आहेत. त्यांच्या कौटुंबिक मूल्यांना चालना देण्यासाठी कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची पायाभरणी ही याच माध्यमातून होते असे पांढारकर म्हणाल्या.
 
 
अतुल शेंडे यांनी अख्ख्या पृथ्वीच्या पटल्यावर स्वतःच्या आधी दुसर्‍याच्या सुखाचा दुःखाचा हिताचे चिंतन करणारे तत्त्व म्हणजे हिंदुत्व! अशा तत्त्वाचा अवलंब करून जगणारे आपण सारे हिंदू इतया उदात्त संस्कृतीचे आपण वर्तमान शिलेदार असल्यामुळे आपण अभिमान केला पाहिजे. आपण सर्व एक आहोत ही भावना मजबूत करण्यासाठी हे हिंदू संमेलन आहेत. हिंदू राष्ट्र घोषित होईल असे नाही पण हे हिंदूच राष्ट्र आहे हे मात्र नक्की असे ते म्हणाले.
 
 
कार्यक्रमापुर्वी संत गोमाजी महाराज येथून शोभायात्रा काढण्यात आली. बॅण्ड पथकासह आखाडा, छत्रपती शिवाजी महाराज वेशभुषा आकर्षण ठरली. संचालन व प्रास्ताविक अरविंद दहापुते यांनी केले तर आभार विनोद कोसुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला नगर संघचालक विनोद नांदूरकर, नगरसेवक किशोर दिघे, प्रतिभा पडोळे, अतुल नंदागवळी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनोद कोसुरकर, विकास नागरकर, देवा पडोळे, जितु लटये, अरविंद दहापुते, मोहन महाजन, विजय बोरकर, मयुर येसनसुरे, आदींनी परिश्रम घेतले.