वॉशिंग्टन,
Six American soldiers died रविवारी झालेल्या इराणी मानवरहित विमानाच्या हल्ल्यात सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चार जणांची ओळख संरक्षण विभागाने जाहीर केली आहे. या घटनेत कॅप्टन कोडी खोर्क (३५), सार्जंट प्रथम श्रेणी नोआ टिएटजेन्स (४२), सार्जंट प्रथम श्रेणी निकोल अमोर (३९) आणि सार्जंट डेक्लान कोडी (२०) यांचा समावेश आहे. हे सर्व सैनिक आयोवा राज्यातील १०३ व्या पुरवठा कमांडमध्ये कार्यरत होते. संबंधित दल अन्न, इंधन, पाणी, दारुगोळा, वाहतूक साधने आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्याचे काम पाहत होते.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या उर्वरित दोन सैनिकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. कुवेतमधील पोर्ट शुआबा येथील नियंत्रण केंद्रावर मानवरहित विमानाद्वारे हल्ला करण्यात आला आणि त्यात हे सैनिक ठार झाले.लष्कर सचिव डॅनियल ड्रिस्कॉल यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी धैर्याने सेवा स्वीकारली आणि त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया देताना संघर्ष थांबेपर्यंत आणखी जीवितहानी होऊ शकते, असे वक्तव्य केले.
दरम्यान, इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. भारत, चीन आणि रशियासारख्या उदयोन्मुख देशांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने जाणीवपूर्वक जागतिक संघर्षांना चालना दिल्याचा आरोप तेहरानकडून करण्यात आला आहे. मात्र युद्ध थांबवण्यासाठी चर्चेला तयार असल्याचेही इराणने सूचित केले असून त्या चर्चा सन्मानजनक अटींवरच व्हाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाचे विशेष प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सांगितले की अमेरिकेचे उद्दिष्ट केवळ इराणपुरते मर्यादित नाही. भविष्यात प्रभावशाली ठरणाऱ्या देशांना रोखण्यासाठीच विविध संघर्ष निर्माण केले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे सध्याची परिस्थित_fg अधिकच संवेदनशील बनली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव कायम आहे.