वर्धेत ५१ भजन मंडळींने केले दिंडीतुन जागरण

*अभिनव धुलिवंदन सोहळा

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-bhajan-mandal : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ वर्धा व अभिनव धुलिवंदन समितीच्या वतीने ५१ भजनी मंडळांच्या माध्यमातून अनिष्ट व तत्त्वहीन रुढींना फाटा देत धुलिवंदनाला प्रभातफेरी काढत प्रबोधनाच्या रंगाची उधळण केली.
 
 
 
wardha-bhajan-mandal
 
 
 
सदर अभिनव धुलीवंदनाची सुरुवात प्रात:काळी ग्रामसभा आणि जमलेल्या कचर्‍याची होळी करण्यात आली. सामुदायिक प्रार्थने नंतर मातोश्री सभागृह ते शहरातून निघालेल्या प्रभात फेरीत जिल्ह्यातील ५१ भजन मंडळीनी टाळ मृदंगाच्या निनादात जनजागृतीवर भजनाचे सादरीकरण केले. उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रभातफेरीत संत तुकाराम, विठ्ठल, रुमिणी, संत गाडगेबाबा, श्रीकृष्ण यांची वेशभूषा रवींद्र भामकर, जनार्दन खडसे, संभाजी मांढरे यांनी साकारली होती. उत्कृष्ट भजनाचे सादरीकरण करण्यार्‍या मंडळाला पुरस्कार देण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार राधे राधे भजन मंडळ मोरांगणा, द्वितीय माऊली भजन मंडळ हिंगणा, रेणुका भजन मंडळ माळेगाव (ठेका) तर प्रोत्साहन पर पुरस्कार अनुसया भजन मंडळ बोरगाव सावली, जय भोले नागद्वार स्वामी भजन मंडळ वर्धा, शिवपार्वती महीला भजन मंडळ सावंगी (मेघे ) यांना देण्यात आला. दिंडी स्पर्धेचे परीक्षण सुभाष मुन्ने, राधेश्याम जयस्वाल, दीपक डोंगरे यांनी केले. क्रांतिनायक नाटकातील कलावंत पुरुषोत्तम मिराशी, विलास कुबडे रमेश लखमापूरे यांचा कला गौरव पुरस्काराने तसेच श्री संत लहानुजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष सचिन सिंघम यांचा सहकारी मित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
 
 
मातोश्री सभागृह येथे आयोजित समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सयाजी महाराज, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वांधिकारी प्रकाश महाराज वाघ, काँग्रेसचे वर्धा जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, पिपरी ग्रापंच्या सरपंच वैशाली गौळकार, सदस्य विद्या कळसाईत, पंसच्या माजी सदस्य अर्चना वानखेडे, सुनिल बुरांडे, बाळासाहेब मिसाळ, संदीप चिचाटे, चंद्रशेखर दंडारे, ,पद्माकर बाविस्कर, डॉ. दीपक पुनसे, मुरलीधर बेलखोडे, अतुल तराळे, संघपाल महाराज, संजीव लाभे, राजेश राजुरकर, प्रकाश राऊत, अनिता कडू, डॉ. देविदास धरवार, दिवाकर उभाड, सुभाष भोयर, आदी उपस्थित होती.
प्रास्ताविक संजय ठाकरे यांनी केले. संचालन पल्लवी काकपुरे आणि शुभम धरवार यांनी केले. आभार चंद्रकिशोर धरवार यांनी मानले. मानपत्राचे वाचन मनीष जगताप यांनी केले.