राज्यात महिला व मुलींच्या बेपत्त्या होण्याचे प्रकरण वाढले; धक्कादायक आकडेवारी समोर

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
मुंबई, 
women-girl-missing-case-increased महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर स्थिती उघडकीस आली आहे. राज्य शासनाने विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या 2024च्या तुलनेत वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाढीला गंभीर मानले आहे.
 
women-girl-missing-case-increased
 
शासनाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये बेपत्ता महिलांची संख्या ४५ हजार ६६२ होती, तर अल्पवयीन मुली ११ हजार ३१६ होत्या. मात्र 2025 मध्ये ही संख्या वाढून महिलांची संख्या ४८ हजार २७८ आणि मुलींची १३ हजार ११३ झाली.  महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर स्थिती यामुळे महिलांमध्ये २,६१६ आणि मुलींमध्ये ७९७ ने वाढ झाली आहे. बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना शोधण्यासाठी पोलिस दलाने विशेष मोहिमा राबवल्या आहेत. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत आतापर्यंत ४१,१९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश आले आहे. बेपत्ता महिलांपैकी ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षभरात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते. शोध घेण्याच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "साधारणपणे वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा घरातील लोक पाठपुरावा करणे सोडतात, ही चिंता वाटते. दर महिन्याला महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाने विशेष बैठक घेतली जाते.  महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर स्थिती उत्तम कामगिरी करणाऱ्यांची दखल घेतली जाते." सर्वाधिक बेपत्ता महिलांचा शोध लावणाऱ्या पोलीस स्थानकावरही विशेष लक्ष देण्यात आले असून, ९५-९६ टक्के शोध घेण्याच्या दरापर्यंत मोहिमा सुरू राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या आकडेवारीमुळे महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्यस्तरीय प्रयत्न अधिक जोरदार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.