दुचाकीच्या भीषण अपघातात युवक ठार

एक जखमी

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
रिसोड, 
bike accident धुलीवंदनाच्या दिवशी रिसोड मालेगाव मार्गावर गवळी फार्म हाऊसजवळ दुचाकी नाल्याच्या पुलावर दुभाजकामध्ये जाऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे घटना ३ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. घटनेतील मृतक व जखमी हे रिसोड तालुयातील गणेशपुर येथील निवासी असून या घटनेनंतर गणेशपुर गावावर शोककळा पसरलेली आहे.
 
 
 
bike aacident
 
 
दोन तरुणाच्या झालेल्या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रिसोड ग्रामीण रुग्णालय गाठले. पवन सुरेश खंडागळे वय १९ असे मृतकाचे नाव असून गौरव पाचरणे वय २० असे जखमीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघे युवक दुचाकीवरून मालेगाव चे दिशेने रिसोड कडे येत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला नालाच्या पुलांमधील दुभाजकामध्ये घुरली. धडक इतकी जबरदस्त होती की पवन खंडागळे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही युवकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी पवन खंडागळे याची डॉटरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. गौरव पाचरणे यास पुढील उपचाराकरिता वाशीम येथे रवाना करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.bike accident अपघाताचे नेमके कारण वेग, रस्त्याची स्थिती की अन्य काही याबाबत पुढील तपास सुरू आहे. धुलीवंदनासारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे व सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.