जनगावचे गटशिक्षणाधिकारी निलंबित

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
दोन विद्यार्थ्यांसह पालकाला अटक
अंजनगाव येथील उत्तरपत्रिका चोरीचे प्रकरण
 
अंजनगाव सुर्जी, 
Anjangaon: Case of answer sheet theft संपूर्ण राज्यात खळबळ माजवून देणार्‍या २७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शालांत परीक्षा पेपर फुटी आणि चोरी प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले असले तरी विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेला गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
paper le
 
विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याचे पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीला गेलेला पेपर या विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एका अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याची आई नगरसेविका असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
 
 
आठवले यांच्याकडे पदभार
Anjangaon: Case of answer sheet theft  पेपर फुटीच्या गुन्ह्यात थेट सहभाग आढळल्याने अटकेत असलेले गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्यावर शिक्षण विभागाने निलंबनाची कुर्‍हाड चालवली आहे. खोडे यांच्या निलंबनानंतर विस्तार अधिकारी आठवले यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर काही सुत्रधार अद्याप मोकाटच? असून पोलिसांनी जरी काही आरोपींना जेरबंद केले. तपास पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले जात असले तरी या रॅकेटमधील ’काही मासे’ अद्याप मोकाट असल्याची जोरदार चर्चा जनमानसात आहे. फरार असलेला आरोपी सुशील अभ्यंकर या एका आरोपीच्या अटकेनंतर या साखळीतील मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असून प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.