हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज : राजेश्वरानंदचार्य

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
आर्वी येथे हिंदू संमेलन
 
आर्वी, 
आपली भारतीय सभ्यता आणि सनातन संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असून आर्वी शहर हे अध्यात्माचे माहेरघर आहे. शहरात अनेक नामवंत संत होऊन गेले. त्यांनी आपल्याला मोलाचे धार्मिक, नैतिक, सामाजिक, अध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यामुळे आपल्याला आपली प्राचीन सनातन हिंदू संस्कृती, धर्म टिकवण्यासाठी प्रत्येक जागृत हिंदुनी आपल्या परपंरेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन स्विकारायला पाहिजे, असे प्रतिपादन जगतगुरु-रामानंदाचार्य-राजेश्वरानंदचार्य, कौंडण्यपूर यांनी केले. स्थानिक गुरुनानक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित Arvi: Hindu Smmelan हिंदू संमेलनात ते हिंदू बांधवांना संबोधित करताना बोलत होते. व्यासपीठावर हिंदू धर्माच्या अभ्यासक डॉ. सीमा पांढरकर उपस्थित होत्या.
 
 
Arvi
 
राजेश्वरानंदचार्य पुढे म्हणाले की, जगातील अनेक परकीय शतींनी अनेक विध्वंंसक, विनाशकारी आक्रमक हल्ले करून हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, सनातन हिंदू धर्माच्या भारतीयांनी हे हल्ले परतावून लावून हिंदू संस्कृती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भारतीय धर्म, संस्कृती, मूल्ये टिकवण्यासाठी साप्रंत काळात युवकांनी देशाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
डॉ. सीमा पांढरकर यांनी हिंदू धर्माचे महत्त्व विषद करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये अनेक थोर महापुरुष, नामवंत संत जन्माला आले आहे. त्यांनी भारतीयांच्या मनात जाज्वल मूल्ये, देशभिमान, स्वधर्माबद्दल आदरभाव शिकविण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. त्यामुळे आपली पुरातन Arvi: Hindu Smmelan  हिंदू संस्कृती काळाच्या प्रवाहात टिकून आहे. समाजाप्रती आपले नैतिक कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासून आपण हिंदूंच्या एकत्रिकरणासाठी पुढाकार घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक समरसता जोपासल्यास, हिंदू संस्कृती व सनातन धर्माला बळकटी मिळेल, असेही त्यांनी विषद केले. महिलांनी सुद्धा आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणे टाळले पाहिजे. त्यासाठी आपल्या वैयतिक व सामाजिक जीवनात स्नेहभाव, परोपकार, नैतिकता, साधनसुचिता जपली पाहिजे. हिंदू हा समाज सहिष्णू असून तो दुसर्‍या धर्माचा आदरभाव करतो. परंतु, तथाकथित धर्मनिरपेक्षता जपणारी हिंदू द्रोही शती हिंदूंचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव खेळत आहे. हा डाव भगव्याला नमन करणार्‍या हिंदूंनी उधळून लावून त्यांचे मनसुबे उधळून लावून संपूर्ण हिंदू समाजाला संघटित केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. संचालन संपदा जोशी तर प्रास्ताविक मिथिलेश बिजवे यांनी केले. आभार महेंद्र गोमासे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिल जोशी, डॉ. विनय देशपांडे, श्रीकांत पेंडके, अभय हळवे, व्हि. टी. देशपांडे, रमेश नागोसे, सुरेंद्र पारसे, सुनील पारसे, मिथिलेश बिजवे, विती गुल्हाणे, मुकुंद देशपांडे, रमेश ठाकरे, राजू मांजरे, आदींनी सहकार्य केले.