‘मराठी बाणा’चे अशोक हांडे यांना मारहाण

आरोपी अटकेत

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मुंबई
Ashok Hande attack, मराठी संस्कृतीचे जागतिक पटलावर प्रसार करणारे आणि सुप्रसिद्ध कार्यक्रम मराठी बाणा’ चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्यावर पार्किंग वादातून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रथमेश पांडुरंग अनफोडे उर्फ बंटी याला अटक करण्यात आली आहे.
 

Ashok Hande attack, Ashok Hande assaulted Mumbai, 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास मुंबईतील माटुंगा पश्चिम येथील युनायडेट हाऊसच्या तळमजल्यावरील कार्यालयात घडली. आरोपी प्रथमेश बॅट घेऊन थेट कार्यालयात आला आणि आधी काचांची तोडफोड केली. त्यानंतर अशोक हांडेंकडून पार्किंगचे पैसे मागायला सुरुवात केली, परंतु अशोकांनी नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करत बॅटने मारहाण केली.कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अधिक आक्रमक झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावरही आरोपीने हुज्जत घालणे सुरू ठेवले आणि पोलिसांसमोरही अपशब्द वापरले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अशोक हांडे हे लेखक, Ashok Hande attack, दिग्दर्शक, निर्माते आणि लोककलेचे अभ्यासक आहेत. ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशावर आधारित असून जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत संस्कृती पोहोचवण्याचे काम करत आहे. मारहाणीत त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सध्या उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांनी धक्क्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अद्याप अशोक हांडे यांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.