बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणासाठी 16 मागण्या

चंद्रपूर, 
Bandu Dhotre: Satyagraha जिल्ह्यात वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष थांबावा, वाघांचा भ्रमणमार्ग मोकळा व्हावा तसेच लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द व्हावा यासह 16 मागण्यांसाठी गुरुवार, 5 मार्चपासून इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू झाले आहे.
 
 
bandu
 
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात 200 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यात मागील वर्षी 47 मृत्यू, तर ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत 18 व्यक्तीचा मृत्यू झाला. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या 10 वाघांना गेल्या एका वर्षात जेरबंद करण्यात आले. जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष शिगेला पोहचला असताना अत्यंत महत्वाच्या कॉरिडोरमध्ये खाणीला वन्यजीव विषयक परवानगी देण्यात आली. त्याचा विरोध पर्यावरणवादी संस्थेकडून करण्यात येत आहे.
 
 
Bandu Dhotre: Satyagraha गुरुवारी बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळी नागरिकांनी भेट देऊन समर्थन दिले. यात ग्रीन प्लॅनेट संस्थेचे प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, किशोर जामदार, रमेशचंद्र दहिवडे, भाविक येरगुडे, विलास माथनकर, मोहम्मद शरीफ, धर्मेंद्र लुणावत, विवेक जिराफे, भारती शिंदे, योजना धोतरे, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.