आम्ही आत्महत्या करावी का?

बिल्डर एन. कुमार यांचे न्यायालयात गैरवर्तन

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
builder n kumars ‘आम्ही न्यायालयात 10 लाख रुपये जमा केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आमचे प्रकरण पूर्णपणे ऐकावे लागेल. अन्यथा प्रकरण ट्रान्सफर करा. आम्ही आत्महत्या करावी का?’ अशा प्रकारचे शब्दांचा वापर बिल्डर एन. कुमार यांनी करीत उच्च न्यायालयात गैरवर्तन केले. न्यायालयाने त्यांच्या या वर्तवणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. पूनम टाॅवर्स व पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात सुनावणी सुरु असून न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
 
builder
 
पूनम टाॅवर्स व पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकामाशी निगडित दाेन याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे प्रलंबित आहेत. मूळात या दाेन्ही याचिकांमधील एन. कुमार यांची मागणी फेटाळून हे बांधकाम अवैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करीत न्यायालयाने याचिका निकाली काढल्या आहे. केवळ या याचिकेतील अवैध बांधकाम पाडण्याच्या आदेशांच्या पूतर्तेबाबत या याचिकांवर सुनावणी हाेते आहे. त्यामुळे या दाेन्ही इमारतींमधील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, हे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. ते आपण पाडू अशी खात्रीही याचिकाकर्ते एन.कुमार यांनी दिली हाेती. मात्र, पाडकाम संथ गतीने सुरू असल्याबाबत न्यायालयाने गेल्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली हाेती. याचिकाकर्त्याने स्वतः अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र सादर करण्यात आलेल्या स्थिती अहवालानुसार प्रत्यक्षात काेणतीही ठाेस कारवाई झालेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
 
आज बुधवारी या प्रकरणी न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे व न्यायमूर्ती निवेदिता पी. मेहता यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याने परत एकदा बांधकाम नियमितीकरणाच्या मुद्द्यावर वारंवार युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. न्यायालय आदेश लिहीत असताना सातत्याने हस्तक्षेप करून ‘आपकाे सूनना पडेगा, हम क्या सुसाईड कर ले क्या’? असे युक्तिवाद परत एकदा एन. कुमार यांनी केले.builder n kumars यावर खंडपीठाने त्यांना न्यायालयीन शिष्टाचार पाळण्याचे निर्देश दिले. तरीही ते ऐकत नसल्याने अखेर त्यांना न्यायालया बाहेर नेण्यास सांगण्यात आले.
....