इराण-इस्रायल युद्धावर चीन घाबरला?

संरक्षण बजेटमध्ये १० टक्क्यांची वाढ

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
बीजिंग,
China's defense budget increases अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाने संपूर्ण जग हादरले आहे. दोन्ही देश इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत असून आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनेई यांचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर युद्धाचा भडका अधिकच भडकला असून मध्यपूर्वातील देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत चीनने या युद्धाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून इराणच्या बाजूने नाराजी दाखवली आहे. युद्ध सुरू असतानाच चीनने एक धडकी भरवणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चीनने आपल्या सैन्याचा बळकटीकरण करण्यासाठी संरक्षण बजेटमध्ये १० टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर चीनचा संरक्षण बजेट आता २७५ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत २५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
 
 

chaina 
 
चीनच्या या निधीवाढीमागचा उद्देश आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करणे आणि अमेरिकन सैन्याशी बरोबरी साधणे हा आहे. संरक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढीमुळे आता चीनच्या शेजारील राष्ट्रांनाही त्यांच्या संरक्षण क्षमतेवर लक्ष देणे गरजेचे ठरले आहे. अमेरिकेनंतर चीनचे संरक्षण बजेट हे जगात सर्वाधिक मोठे आहे. यापूर्वी २०२४ साली चीनने संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्क्यांनी वाढ करून २३२ अब्ज डॉलर्सपर्यंत तरतूद केली होती. सध्या चालू असलेल्या इराण-इस्रायल युद्धात चीनने थेट हस्तक्षेप केलेले नाही, तरी अमेरिकेच्या भूमिकेला चीनने विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर युद्धाचा भडका भविष्यात आणखी वाढेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.