मुंबई,
प्रCrime against Varsha Usgaonkar सिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह पाच जणांची सुमारे ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवून आरोपी अविनाश जाधव यांनी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला काही पैसे परत करून विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर पैसे देणे थांबवण्यात आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे फसवणूक व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार मृणालिनी सुभाष जांभळे या रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा अविनाश जाधव यांच्याशी व्यावसायिक परिचय होता. जाधव यांनी डोंबिवली येथील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच एका वर्षाच्या आत संपूर्ण मूळ रक्कम परत करण्याची हमीही त्यांनी दिली होती. नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत मृणालिनी जांभळे, वर्षा उसगावकर आणि इतर तिघांनी मिळून सुमारे ४७ लाख रुपये धनादेश आणि ऑनलाईन माध्यमातून जाधव यांच्याकडे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.