मूल्यवर्धनातून राष्ट्रीय बाजारपेठ काबीज करा : जिल्हाधिकारी कुंभेजकर

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
वाशीम, 
जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेत ग्रामीण उद्योजकांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन District Collector Yogesh Kumbhejkar जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अंतर्गत आयोजित खरेदीदार —विक्रेता संमेलन ४ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. हा कार्यक्रम स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाबीज अकोलाचे महाव्यवस्थापक (विपणन) विजय देशमुख, महाव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण) डॉ. प्रफुल्ल लहाने तसेच महाव्यवस्थापक (उत्पादन) विवेक ठाकरे उपस्थित होते.
 
 
kunbhejkar
 
प्रकल्प संचालक, आत्मा वाशीम अनिसा महाबळे यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात निर्माण होणार्‍या विविध उत्पादनांची माहिती, उपलब्ध सुविधा आणि संमेलनामागील उद्देश सांगितला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह यांनी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना या संमेलनातून मिळणार्‍या व्यावसायिक संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संमेलनात राष्ट्रीय मसाले मंडळ कडून डॉ. ममता धनकुटे, नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेड कडून योगेश खुडेकर, ए. आर. ग्लोबल एझिम ट्रेडर्स कडून शमशुद्दीन शेख तसेच टील अँड स्पोर्ट लिमिटेड कडून चिराग जैन यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमस्थळी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सहभागी खरेदीदार व विक्रेत्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
 
 
District Collector Yogesh Kumbhejkar  कार्यक्रमाचे संचालन कृषी उपसंचालक हिना शेख यांनी केले तर तंत्र अधिकारी संतोष थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभाग व आत्मा यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला.
जी.