महिलेने पतीच्या मदतीने केली प्रियकराची हत्या
खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या ‘लाईव्ह मर्डर’!
अनिल कांबळे
नागपूर,खापरखेड़ा,
haparkheda-Karadi -murder खापरखेड़ा-काेराडी मंदिर मार्गावर भरदिवसा एका युवकावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (5 मार्च) सकाळी साडेअकरा वाजता घडली. सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. तर राजू गजभिये आणि पत्नी साेनाली गजभिये (रा. वाॅर्ड क्र. 2, खापरखेडा) असे आराेपी पती-पत्नीचे नाव आहे. हे हत्याकांडाचे लाईव्हफुटेज अनेकांच्या माेबाईलवर पाेहचले असून दिवसभर या हत्याकांडाचीच चर्चा हाेती.
haparkheda-Karadi -murder प्राथमिक माहितीनुसार, आराेपी पत्नी साेनाली आणि सागर यांचे शालेय जीवनापासूनच प्रेमसंबंध हाेते. साेनालीने नंतर राजू गजभियेशी लग्न केले आणि त्यांना दाेन मुले आहेत. परंतु साेनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात हाेते. राजू गजभिये यांनी यापूर्वी खापरखेडा पाेलिस ठाण्यात तक्रार केली हाेती. दरम्यान, सागर पुण्याहून सावंगी गावी हाेळीसाठी आला हाेता. या दरम्यान त्याने साेनालीला इंस्टाग्रामवर मॅसेज करून भेटण्याची मागणी केली. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सागर हा खापरखेडा येथे पाेहाेचला आणि साेनाली त्याच्या दुचाकीवरून श्याम मंगलम या ऑिफसजवळ निघून गेली. साेनालीनेही तिच्यासाेबत चाकू घेतला. मुलांना शाळेत साेडल्यानंतर राजू गजभिये त्यांच्या मागे गेला. खापरखेडा-काेराडी राेडवरील काेलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर साेनालीने मुद्दाम तिची पर्स खाली पाडली. सागरने त्याची बाईक पर्स उचलण्यासाठी थांबवताच, साेनालीने चाकू काढत सागरवर चाकूने सपासप वार केले. त्याच वेळी घटनास्थळी पाेहाेचलेल्या राजू गजभियेनेही सागरवर चाकूने वार केले. घटनेनंतर, दाेन्ही आराेपी घरी परतले. नंतर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान दाेघांनीही हत्येची कबुली दिली. गंभीर जखमी सागर वानखेडेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
काेराडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेचा काही भाग खापरी परिसरात येताे, जाे काेराडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येताे. त्यामुळे, काेराडी पाेलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा काेराडी पाेलिस पुढील तपास करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर खापरखेडा आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वाहनचालक बनले भावनाशून्य
साेनाली आणि राजू हे दाेघेही अगदी रस्त्याच्या कडेला सागरवर चाकूने सपासप वार करीत हाेते. हा संपूर्ण प्रकार रस्त्याने जाणाèयांच्या समाेर घडला. अनेकांनी ही घटना त्यांच्या माेबाईलवर रेकाॅर्ड केली, परंतु आराेपींनी राेखण्यासाठी काेणीही हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही. अनेक जण भावनाशून्य हाेऊन ‘लाईव्ह मर्डर’ बघत हाेते, हे विशेष.