मुंबई
Maharashtra Rajya Sabha election महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या राजकीय चर्चेला वेग आला आहे. १६ मार्चला महाराष्ट्रातील ७ जागांसह, १० राज्यांतील ३० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी गणित जुळवणे आणि संख्याबळ ठरवणे यासाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय गती वाढली होती. अखेर महायुतीत भाजपने ४ आणि मविआतर्फेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मविआधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव एकमताने शिक्कामोर्तब केले आहे. एनसीपीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत काही अट होती का, याबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “जयंत पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे विलीनीकरणाचा प्रश्न आता संपलेला आहे. काही निष्पन्न होणार नाही, ही दंतकथा होती. आता आम्हाला मविआ म्हणून एकत्र काम करावे लागेल, याची मानसिक तयारी आहे.”
संजय राऊत Maharashtra Rajya Sabha election म्हणाले की, “सत्ता येते, सत्ता जाते. जनतेने विरोधी पक्षात दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात आणि देशात भाजपच्या सरकारने अपयश घेतले आहे. प्रश्नांचा डोंगर समोर आहे आणि विरोधी पक्षाने जनतेच्या आवाजासाठी काम करावे. उगाच सत्तेच्या मागे धावू नये, आगामी निवडणुकांची तयारी करावी.”राज्यातील या निवडणुकीत शरद पवारांना मिळालेला सर्वसमावेशक पाठिंबा आणि विरोधी पक्षातील संघटनात्मक एकजूट यामुळे पुढील राजकीय समीकरणांवर महत्त्वाचा परिणाम होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक देत आहेत.