‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ मोहीम

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

यवतमाळ, 
राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणार्‍या ‘majhan gav, arogyasampanna gav’  ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्वाकांक्षी अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लोकसहभागावर ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली असून १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
 
 
Gav
 
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यवतमाळ जिल्ह्यातही ‘majhan gav, arogyasampanna gav’  ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यांसह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणा, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, जलजन्य आजारांचे नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य या विषयांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.
 
 
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन येणार आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यस्तर समिती कार्यरत राहणार असून विविध विभागांचे अपर मु‘य सचिव, आयुक्त व संचालक हे सदस्य असतील. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत राज्यस्तर कृती समितीही स्थापन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येणार असून एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानासाठी सुमारे ८०.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
 
 
‘majhan gav, arogyasampanna gav’  ही योजना केवळ आरोग्य विभागापुरती मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून उभी राहणारी लोकचळवळ ठरणार आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी मिळण्यासह आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे. ही योजना यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांना या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.