उपोषणाला यश, मुख्याधिकार्‍यांचे मांसविक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे आदेश

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
शहरातील प्रभाग १६ येथे महामार्गालगत Mutton Market  मटन मार्केट आहे. मटन-चिकनची दुकाने असल्याने अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीने तसेच भटया श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात वारंवार नपंला निवेदने देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर आज गुरुवारपासून नागरिकांनी मटन मार्केट इतरत्र स्थलांतरित करावी, या मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोरच आंदोलन सुरू केले. या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी मटन मार्केट गाठून सदर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले.
 
 
meet
 
हे Mutton Market मटन मार्केट राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर व बसस्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. या पृष्ठभूमीवर २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रभाग १६ मधील नागरिकांनी नपं मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर चार दिवसांत मोकाट पिसाळलेल्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करून एक महिन्याच्या आत मटन मार्केटचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली होती. समस्या तात्काळ न सुटल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
 
 
Mutton Market  यानंतर १ ऑटोबर रोजी कारंजा येथील विश्रामगृहात आमदार दादाराव केचे व मांस विक्रेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्याधिकारी, नपंचे स्वीकृत सदस्य नितीन दर्यापूरकर, प्रभाग १६ चे नगरसेवक राजेश लाडके व सामाजिक कार्यकर्ते सुनील वंजारी, नागरिक उपास्थित होते. या बैठकीत मुख्याधिकारी यांनी मटन मार्केटसाठी महामार्गाकडील व चक्रीघाटाजवळ तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. मात्र त्या दोन्हीही जागेवर मांस विक्रेत्यांनी रोजगार होणार नाही, असे सांगून नाराजी व्यत केली होती. यापूर्वी मांस विक्रेत्यांना कचरा डेपोजवळ जागा देण्याचे ठरलेले होते. परंतु, कचरा डेपो नियोजित ठिकाणी स्थल्लांतरित करायला अजूनही तीन-चार महिने लागणार असल्याचे तेव्हा मुख्याधिकार्‍यांनी सांगितले होते. त्यामुळे हा प्रश्न सुटलेला नव्हता. दरम्यान, आज शेवटी मुख्याधिकारी यांनी मटन मार्केटमध्ये जाऊन तेथील दुकाने बंद करायला सांगितले असून उपोषणामुळे नागरिकांना मटन मार्केट स्थलांतरित करण्यात यश मिळाले.