इराणच्या मदतीला आला मोठा देश; ट्रम्प-नेतान्याहूंची चिंता वाढली

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
तेहरान, 
north-korea-help-iran अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या जोरदार हल्ल्यांमुळे इराणला मोठे नुकसान सहन करावे लागले असून अनेक ठिकाणी विध्वंसाचे चित्र दिसत आहे. युद्धाला सुरुवात होऊन आता पाच दिवस उलटले आहेत आणि या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. या युद्धात अमेरिकेला अनेक देशांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या देशांनी अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
 
north-korea-help-iran
 
दुसऱ्या बाजूला इराण जवळजवळ एकटाच लढत असल्याचे चित्र दिसत असले तरी त्यांनी माघार घेतलेली नाही. उलट इराणकडून इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ले करण्यात येत आहेत. तसेच ज्या ज्या मुस्लिम देशांमध्ये अमेरिकेचे सैनिकी तळ आहेत, त्या ठिकाणांनाही लक्ष्य करून हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या कारवायांमुळे अमेरिका आणि इस्रायललाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याचे सांगितले जात आहे. north-korea-help-iran दरम्यान पाकिस्तान, चीन आणि रशिया हे देश इराणचे जवळचे मित्र मानले जात असले तरी प्रत्यक्ष संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही थेट लष्करी मदत मिळालेली नाही. चीन आणि रशियाने केवळ या हल्ल्यांचा निषेध नोंदवला असून अमेरिका आणि इस्रायलची कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी प्रत्यक्ष युद्धात उतरून कारवाई केलेली नाही.
यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे सांगितले जाते. रशिया आधीपासूनच युक्रेनविरुद्धच्या दीर्घकालीन युद्धात अडकलेला आहे. त्या संघर्षामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत असून लष्करी शक्तीही मोठ्या प्रमाणात त्याच आघाडीवर गुंतलेली आहे. दुसरीकडे चीनचे लक्ष तैवानवर नियंत्रण मिळवण्याच्या धोरणावर केंद्रित असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही देश सध्या प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्यापासून दूर राहिले आहेत. मात्र या परिस्थितीत इराणसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर कोरियाने उघडपणे इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. north-korea-help-iran उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच इराणला गरज भासल्यास क्षेपणास्त्रांच्या स्वरूपात मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घोषणेमुळे संघर्षाचे स्वरूप आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर कोरियाच्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्येही चिंता वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या युद्धाची दिशा नेमकी कोणती असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.