बुलढाणा,
होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो सामाजिक ऐय,बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा सण आहे. बंजारा समाज हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असून महिलांचे योगदान समाजघडणीत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध आहोत.
होळी सणाच्या मंगलमय वातावरणात Sanjay Gaikwad आ. संजय गायकवाड यांनी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे मतदारसंघातील बंजारा समाजातील महिलांसमवेत होळी साजरी करत सामाजिक ऐयाचा सुंदर संदेश दिला.या प्रसंगी बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहत सणाचा आनंद द्विगुणित केला. रंगांची उधळण, पारंपरिक गीतांच्या तालावर नृत्य आणि एकमेकांना शुभेच्छा देत होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आ. संजय गायकवाड यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध शासकीय योजनांबाबत माहिती घेतली. कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.