मुंबई
Supriya Sule राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शरद पवार Sharad Pawar यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आघाडीतील घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे आभार मानले.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानतात.यावेळी राज्यसभेवर प्रथमच जाणाऱ्या पार्थ पवार Parth Pawar यांच्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “तुमच्याकडे लोकसभेचा प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून पार्थ पवार यांना काय सल्ला द्याल?” असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी संसदीय कामकाजाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला.
त्या म्हणाल्या की, Supriya Sule आदरणीय शरद पवार यांनी स्वतः त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. तोच सल्ला त्या प्रत्येक नव्याने संसदेत जाणाऱ्या सदस्याला देतात. “राज्यसभा असो किंवा लोकसभा, कान नेहमी उघडे ठेवावेत आणि कमी बोलावे. जेव्हा बोलण्याची वेळ येईल तेव्हा अभ्यासपूर्ण आणि जबाबदारीने बोलावे. कारण संसदेत बसलेले अनेक जण आपल्यापेक्षा अधिक अनुभवी असतात आणि संपूर्ण देश आपल्याकडे पाहत असतो,” असे त्या म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या की, जेव्हा त्या प्रथमच लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या, तेव्हा त्या आणि शरद पवार एकाच गाडीतून संसद भवनाकडे जात होते. त्या वेळी जुन्या संसद भवनाच्या पायऱ्या चढताना पवार साहेबांनी त्यांना सांगितले होते की, “तुला मिळालेली ही संधी केवळ बारामती मतदारसंघामुळे मिळाली आहे, त्यामुळे याची कायम जाणीव ठेव आणि त्या भावनेशी प्रामाणिक राहा.”हा अनुभव सांगत सुप्रिया सुळे यांनी नमूद केले की, संसदेत जाणे ही मोठी जबाबदारी आहे आणि त्याबाबत नम्रता व जनतेप्रती बांधिलकी कायम Supriya Sule ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आत्या आणि सहकारी म्हणून पार्थ पवार यांना देखील हाच सल्ला त्या देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.