शरद पवारांनी घरूनच भरला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज!

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Sharad Pawar's nomination form आज राज्यसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत इतिहासाची पहिली नोंद झाली आहे. भाजपकडून चार उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि शिवसेनेकडून एक अर्ज दाखल झाला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहता न देता आपला अर्ज दाखल केला.शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांची शपथ घेण्यात आली. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शपथपत्र घेतले. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील या अर्जासह विधीमंडळात जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज सादर केला.
  

sharad 
 
शरद पवारांनी सुरक्षिततेसाठी आणि विधीमंडळ प्रक्रियेत कोणतीही अडचण टाळण्यासाठी दोन अर्ज दाखल केले आहेत – एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष, ज्यामुळे कोणत्याही अपघातामुळे उमेदवारी प्रभावित होणार नाही.या प्रक्रियेचा आधार संविधानाच्या कलम ८४ अ अंतर्गत आहे, ज्यात उमेदवार आरोग्य किंवा इतर वैध कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर शपथपत्राद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. महाराष्ट्राच्या इतिहासात शरद पवार हे पहिले लोक आहेत ज्यांनी अशा पद्धतीने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.