शिक्रापुरात तलावात पोहायला गेलेल्या तीन मुली बुडाल्या

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
शिक्रापूर
Shikrapur drowning accident, पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गेलेल्या तिघी मुली पाण्यात बुडल्याने दोन मुली मृत्युमुखी पडल्या तर एक मुलगी सुदैवाने वाचली. मृत मुलींची नावे साक्षी गोरख मुरकुटे (वय १०) आणि पायल भरत पवार (वय १४) आहेत, तर दिव्या गोरख मुरकुटे (वय १२) ही वाचली.
 
 
sbi-cashier-drowns-in-chhattisgarh
सुरेखा मुरकुटे या भारत गॅस फाट्याजवळील गरुडझेप अकॅडमी पाठीमागे असलेल्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या तिथे साक्षी, दिव्या आणि पायल या तिघी मुलींसह गेल्या होत्या. तिघी मुली तलावात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना बुडण्याचा धोका निर्माण झाला. सुरेखा मुरकुटे यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी नागरिक धावत येऊन मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला.सुरवातीला दिव्या मुरकुटे बाहेर काढण्यात आली, परंतु साक्षी व पायल दोघी अजूनही पाण्यात बुडल्या. नागरिकांच्या अथक Shikrapur drowning accident प्रयत्नांनी दोघींना पाण्याबाहेर काढले, परंतु रुग्णालयात उपचार सुरू असतानाच साक्षी आणि पायलचा मृत्यू झाला. दिव्या मुरकुटे सुदैवाने वाचली. या घटनेसंबंधी पारुबाई अशोक जाधव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, पोलीस हवालदार नरेश गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका दुर्दैवी घटनेत, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात वैनगंगा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ आणि चिंता निर्माण करणारी ठरली आहे.
दोन्ही घटनेतच पाण्याशी संबंधित असलेल्या नियमांची काटेकोरपणे पालन करण्याची गरज अधोरेखित होते, विशेषतः लहान मुलं व तरुणांना खोल पाण्यात एकट्याने जाण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे.