शिंदेंचे धक्कातंत्र...राज्यसभेसाठी महिला उमेदवार!

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Shinde's female candidate for Rajya Sabha एकनाथ शिंदे यांच्या गटातून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार राज्यसभेवर जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतल्यास महायुतीच्या सहा उमेदवारांची निवड निश्चित आहे, तर महाविकास आघाडीकडून एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवाराचे नाव शेवटपर्यंत गुपित ठेवले गेले होते. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत होते, मात्र अंतिम निर्णयात शिंदेंनी आश्चर्यकारक पाऊल उचलले आणि महिला उमेदवाराला संधी दिली. त्यानुसार ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे.
 
 
 
Rajya Sabha
सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी कोण जाणार हे शेवटपर्यंत सस्पेन्समध्ये होते. राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, संजय निरुपम, हेमंत गोडसे आणि महिला उमेदवारांपैकी शायना एन. सी. यांचे नाव चर्चेत असताना ज्योती वाघमारे यांचा उमेदवार म्हणून खुलासा झाल्याने सर्वांसमोर धक्का बसला आहे.