सौर वीज ग्राहकांसाठी अन्यायकारक बदल रद्द करा

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
वर्धा जिल्हा सोलर असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
 
वर्धा, 
Solar power consumer महावितरणने सोलर पॅनल ग्राहकांबाबत घेतलेल्या नव्या निर्णयांच्या विरोधात जिल्हा सोलर असोसिएशनच्या वतीने गुरुवार ५ मार्चला शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो सोलर पॅनल व्यावसायिक आणि ग्राहकांनी सहभागी होत महावितरणच्या धोरणांचा निषेध नोंदविला.
 

solar 
 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून काढण्यात आलेला मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आल्यावर पोलिसांनी तो थांबविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविले. महावितरणने १३ फेब्रुवारी २०२६ पासून Solar power consumer  सोलर ग्राहकांसाठी नवी नियमावली लागू केली असून ती ग्राहकांसाठी अन्यायकारक आहे. नव्या नियमांनुसार आता सोलर सिस्टीम किती किलोवॅटची बसवायची याचा निर्णय महावितरण घेणार आहे. यापूर्वी ग्राहकांना आपल्या गरजेनुसार सोलर सिस्टीम बसवण्याचे स्वातंत्र्य होते. या नियमामुळे ग्राहकांचे अधिकार मर्यादित झाल्याचा आरोप असोसिएशनने निवेदनातून केला आहे. यापूर्वी सोलर सिस्टीममधून अतिरित निर्माण होणार्‍या विजेवर कोणताही दंड आकारला जात नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांवर दंड आकारून त्याची जबरदस्तीने वसुली केली जात असल्याचेही निवेदनात नमुद आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमध्ये विसंगती दिसून येत असून नागरिकांच्या हितार्थ निर्णय घेण्यात यावे, अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.