शाळेचा संचालकच निघाला पेपरफुटीचा सूत्रधार

- आठ जणांना अटक, दाेघे जण अद्याप फरार

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
paper leak बारावीचा बाेेर्डाचा पेपर एका शाळेच्या संचालकानेच फोडल्याचे पाेलिसांच्या तपासातून समाेर आले आहे. त्या संचालकाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्यासाठी पेपर फोडल्याची माहिती समाेर आली आहे. संदीप बाबुराव सरटकर (वय 54) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.
 

पेपरफुटी  
 
 
गेल्या 18 फेब्रुवारीला बारावीचा केमेस्ट्री पेपर सुरु असतानाच पेपर फुटल्याचा प्रकार समाेर आला. चाैकशीत फक्त केमेस्ट्रीच नव्हे तर गणित आणि फिजिक्स हे दाेन पेपरसुद्धा फोडल्याचे समाेर आले. या प्रकरणी सदर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पेपर फुटीच्या प्रकरणाची दखल शिक्षण मंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी घेतली हाेती. या घटनेमुळे नागपूर राज्यभरात चर्चेत आल्यानंतरही आराेपींनी पेपर फोडण्याची मालिका सुरु ठेवली.
 
सदर येथील सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थीनीकडून माेबाईल जप्त करण्यात आला हाेता. त्यामध्ये एका व्हाॅट्सअप ग्रूपमध्ये काही विद्यार्थी हाेते आणि त्यात निशिकांत मुल याने प्रश्नपत्रिका पाेस्ट केली हाेती. त्यात फरहान अख्तर नावाच्या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे उत्तरे पाेस्ट केली हाेती. त्यानंतर या प्रकरणात मुस्ता खान, जुनेद अहमद जावेद शेख, दिनेश शंकर काेटांगळे, मनिष सुदाम शंभरकर, प्रदीप भैय्यालाल जांगडे यांना अटक केली. या सर्वांची चाैकशी केल्यानंतर पेपर फुटीचा मास्टरमाईंड समाेर आला. ताे म्हणजे विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालक संदीप सरटकर हाेय. सरटकर याने शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन बाेर्डाचा पेपर लिक केल्याची माहिती पाेलिसांच्या तपासात समाेर आली आहे. त्यालाही सदर पाेलिसांनी अटक केली.
दाेघे अद्याप फरार
मुख्य आराेपींमध्ये आणखी दाेघांचा समावेश असून त्यांचा शाेध पाेलिस घेत आहेत. त्यांचा पेपर फोडण्यात थेट संबंध आहे. शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील एक शिपाईसुद्धा पाेलिसांच्या रडावरवर आहे.paper leak त्याचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्याला पेपर फोडल्याची संपूर्ण माहिती हाेती. त्यामुळे भविष्यात त्यालाही आराेपी करण्याची शक्यता आहे.
पेपर संपताच विद्यार्थ्यांची चाैकशी
येत्या आठ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर आहे. त्यामुळे येत्या 9 मार्चपासून ज्या विद्यार्थ्यांकडे फिजिक्स, केमेस्ट्री आणि गणिताचा पेपर उपलब्ध झाला हाेता, अशा विद्यार्थ्यांना पाेलिस चाैकशीसाठी बाेलावणार आहेत. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही चाैकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.