आजपासून दोन दिवस १३ मेमू रेल्वेगाड्या रद्द

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
- रेल्वे प्रवाश्यांची फजिती : दान एक्स्प्रेस रेल्वेगाड्याही नियंत्रित

गोंदिया, 
Trains cancelled नागपूर - रायपूर लोहमार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या गुदमा-गोंदिया समपार फाटक क्रमांक ५०४(९९१/२०-२२) व बोरतलाव-दरेकसा समपार रेल्वेफाटक क्रमांक ४८१ (९४८/१९-२१) रेलखंडावर आरएच गर्डरच्या डी-लाँचिंग कार्यासाठी शुक्रवार ६ व शनिवार ७ मार्च रोजी इतवारी-गोंदिया-डोंगरगड-रायपूरच्या मध्य धावणार्‍या १३ मेमू रेल्वेगाड्यांचे परिचलन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून दरदिवशी प्रवास करणार्‍या प्रवाश्यांची दोन दिवस चांगलीच फजिती होणार आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत इतवारी ते टाटानगर व कोरबा - इतवारी या दोन्ही एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना नियंत्रित करण्यात येणार आहे.
 
 
train
 
Trains cancelled  दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत येत असलेल्या बोरतलाव-दरेकसा व गोंदिया-गुदमा रेल्वेफाटक परिसरात रेल्वेचे डी-लाँचिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ६ व ७ मार्च रोजी रेल्वेच्या अप व डाऊन लाईन वर रात्री ११ ते सकाळी २ वाजतापर्यंत ३.३० तासाचा ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाडी क्रमांक ६८७२१ रायपूर -डोंगरगड मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७२३ डोंगरगड-गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७४१ दुर्ग- गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७४२ गोंदिया-दुर्ग मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७४३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद बोस इतवारी मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७४४ नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७११ डोंगरगड-गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७१३ गोंदिया - नेताजी सुभाषचंद बोस इतवारी मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७१६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७१२ गोंदिया-डोंगरगड ममू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७१५ बालाघाट - नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू, रेल्वेगाडी क्रमांक ६८७१४ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी - बालाघाट मेमू या रेल्वेगाड्यांचे परिचलन ६ व ७ मार्च रोजी रद्द करण्यात आले आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ६८७२४ गोंदिया-रायपूर मेमू या रेल्वेगाडीचे परिचलन ७ व ८ मार्च रोजी रद्द राहणार आहे. त्याचबरोबर रेल्वेगाडी क्रमांक १८१०९ टाटानगर-इतवारी एक्स्प्रेस व रेल्वेगाडी क्रमांक १८२३९ कोरबा-इतवारी या दोन्ही रेल्वेगाड्यांना ६ मार्च रोजी दुर्ग-बोरतलाव रेल्वेस्थानकांत नियंत्रित करण्यात येणार आहे. रेल्वेगाड्या रद्द राहणार असल्याने या मार्गावरून दरदिवशी प्रवास करणारे नोकरदारांसह, व्यवसायीक, विद्यार्थी शासकीय नोकरदारांसह इतर प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.