बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता विजय कृष्णा यांचे निधन

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Vijay Krishna death, चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा Vijay Krishna यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

Vijay Krishna death, Bollywood actor 
विजय कृष्णा यांनी अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. मोठ्या पडद्यावर वडीलधारी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या पात्रांमुळे ते विशेष ओळखले जात. त्यांच्या अभिनयातील गांभीर्य आणि व्यक्तिरेखेतला ठसा यामुळे त्यांनी अनेक चित्रपट संस्मरणीय केले. Devdas या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. दिग्दर्शक संजय लीला भन्सारी Sanjay Leela Bhansali यांच्या या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटात विजय कृष्णा यांनी शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका साकारत ‘नारायण’ ही व्यक्तिरेखा जिवंत केली होती. त्यांच्या या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.याशिवाय त्यांनी पीके, गुजारिश, फँटम PK, Guzaarish, Phantom तसेच या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. इंग्रजी भाषेतील Dance Like a Man या चित्रपटातील त्यांचे कामही विशेष गाजले होते.विजय कृष्णा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. १९८० च्या दशकापासून त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत सातत्याने काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयामुळे भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी समाजमाध्यमांवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अभिनयातील दमदार उपस्थिती आणि प्रभावी व्यक्तिरेखा यामुळे विजय कृष्णा यांची आठवण प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.