नागपूर,
Vishnu Vaman Shirwadkar मराठीचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून पाळला जातो. संतांची वाणी, छत्रपतींचा अभिमान आणि साहित्य-कला-संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या मराठी मायबोलीचा गौरव यावेळी करण्यात आला.
या निमित्ताने सहकार नगर येथील महिला मंडळाच्या वतीने दुचाकी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. “भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याचा अर्थ मराठी” अशा घोषणा देत ही मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन माधवी नादरखानी यांनी केले. Vishnu Vaman Shirwadkar मिरवणूक यशस्वी करण्यासाठीआर्या विघ्ने, शुभांगी जोशी, कामिनी डवरे, साक्षी तारसेकर, रिना ठाकरे, बबीता नागपुरकर, सुवर्णा सरदार तसेच सहकार नगर महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सौजन्य:जयश्री बोबडे ,संपर्क मित्र