सेवानिवृत्तीचा क्षण अनाथांसोबत!

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
आसमंत स्नेहालयाला दिली ३१ हजाराची देणगी
 
पुलगाव, 
Wardha Urban Cooperative Bank Pulgaon सेवानिवृत्ती क्षण प्रत्येक कर्मचार्‍याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा असतो. तो सोहळा केवळ औपचारिक न ठेवता समाजोपयोगी कार्याशी जोडत अविस्मरणीय बनवण्याचा प्रेरणादायी उपक्रम पुलगाव येथील वर्धा नागरी बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍याच्या मित्रमंडळींनी साकारला. भोपे यांनी ‘अनाथ’ परिवारासाठी आपल्या सेवानिवृत्तीतील ३१ हजार रुपयांची देणगीचा धनादेश दिला. विशेष म्हणजे, लहान मुलं, आजी, आजोबा या निराधारांना स्नेहभोजनाचा आनंदही दिली.
 
 
bank
 
Wardha Urban Cooperative Bank Pulgaon वर्धा नागरी सहकारी बँक पुलगाव शाखेतून २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अविनाश भोपे यांनी आपल्या सेवापूर्तीनिमित्त वर्धा येथील आसमंत स्नेहालय येथे अनोख्या स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला. आसमंत स्नेहालयामध्ये सध्या सुमारे ११० अनाथ विद्यार्थी, वृद्ध तसेच मानसिक आजारी रुग्ण आहेत. शिवाजी व माधवी चौधरी हे त्यांचे पालक व कर्तेधर्ते आहेत. कोणतीही शासकीय मदत न घेता समाजाच्या सहकार्यावर चालणारा हा आश्रम अनेकांसाठी हकाचे निवासस्थान ठरले आहे. या सेवाकार्याची जवळून ओळख व्हावी तसेच आयुष्यभर नोकरी केल्यानंतर समाजदेणं या भावनेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. वर्धा नागरी बँकेचे संचालक गणेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बँकेचे माजी सहव्यवस्थापक चंद्रकांत लोणकर, इंडियन मिलिटरी स्कूलचे प्राचार्य रविकिरण भोजने, आसमंत स्नेहालयाचे प्रमुख शिवाजी व माधवी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय बोबडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अविनाश व राजश्री भोपे या दाम्पत्याने चौधरी दाम्पत्याचा सत्कार करून स्नेहालयाकरिता ३१ हजाराचा धनादेशही सुपूर्द केला. गणेश इंगळे यांनी समाजातील मोती वेचून संघटनेच्या माळेत ओवण्याचे कार्य अविनाश भोपे यांनी आपल्या सेवाकाळात केले. बँकेतील अनुभव व ज्ञान त्यांनी नेहमीच इतरांच्या सेवेसाठी वापरले, भविष्यात गरज पडल्यास बँकेला आपण मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
 
 
Wardha Urban Cooperative Bank Pulgaon यावेळी प्रफुल्ल व्यास म्हणाले, समाजातील चांगल्या कार्याची ओळख समाजातील चांगल्या लोकांना व्हावी, या हेतूने सेवापूर्तीचा कार्यक्रम आश्रमात घेण्याची कल्पना अत्यंत अभिनव आहे. अशा उपक्रमांतून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असल्याचे ते म्हणाले. आसमंत स्नेहालयाचे प्रमुख शिवाजी चौधरी यांनी आश्रमात प्रथमच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असून सर्वांनी परिसराला भेट दिल्याचा आनंद असल्याची भावना व्यत केली. यावेळी रविकिरण भोजने, चंद्रकांत लोणकर यांनीही मनोगत व्यत केले. संगीता कदम व रामेश्वरी पेंढारकर यांनीही भोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. आभार दीपाली सावसाकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना आश्रमाच्या कार्यावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. संचालन दीपाली सावसाकडे यांनी केले.