पत्नीच्या खुन प्रकरणी पतीला जन्मठेप

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
मंगरुळनाथ, 
Wife murder case पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी पती रोशन विजय उगले याला विद्यमान सत्र न्यायधीश वैभव पाटील यांनी जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी श्रीकृष्ण तुळशिराम वाकोडे, रा. आरखेड, ता. मूर्तीजापुर ह्यांनी १० एप्रिल २०२१ रोजी फिर्याद दिली की, माझा चुलत भाऊ दिनेश लक्ष्मण वाकोडे रा. ग्राम आरखेड ता. मुर्तिजापुर जि. अकोला यांची मुलगी रिना वय २० हिचे लग्न ग्राम मानोली, ता. मंगरूळनाथ, जि वाशीम येथील रोशन विजय उगले याचे सोबत समाजाचे रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नानंतर काही दिवस रिना हिला तिचे पती रोशन विजय उगले याने चांगले वागविले. त्यानंतर तिचा नवरा रोशन उगले हा नेहमी तिच्या चारित्र्यांवर संशय घेवून व तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्यानंतर नातेवाईकानी मध्यस्थी करून त्यांना समजावुन सांगितले.
 
 
karawas
 
Wife murder case  त्यानंतर रोशन उगले हा रिनाल वागवायास घेवुन गेला. १८ मार्च २०२१ रोजी मंगरूळनाथ येथील नातेवाईक निकेश गावंडे यांचे घरी रोशन विजय उगले याने रिना हिला आणुन सोडले. त्यानंतर २५ मार्च २०२१ रोजी रोशन विजय उगले याची आई ज्योतीबाई विजय उगले ह्या निकेश गावंडे यांचे घरी आल्या व त्यानी सांगितले की, रोशन आता रिनाला चांगला वागवेल माझे सोबत रिनाला पाठवा, त्यामुळे आम्ही रिनाला परत मानोली येथे नांदवायास पाठवविले. त्यानंतर १० एप्रिल २०२१ रोजी निकेश गावंडे याचा फोन आला व त्यानी मला सांगितले की, रिना हिची तब्येत खराब आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले. त्यामुळे मी, रिनाची आई अंजु दिनेश वाकोडे व इतर नातेवाईक असें मानोली येथे आलो. त्यानंतर आम्हाला समजले की, रोशन विजय उगले याने माझी पुतणी रिना हिला लोखंडी पाईपाने डोयावर, डोळयावर, गळयावर मारहाण केली व तिचे डोके फरशीवर आपटून आपटून रीनाला जीवे मारले. 
 
 
Wife murder case त्या फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी रोशन उगले याचे विरुध्द कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदवन्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करून व तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, निलेश शेंबडे, यांनी करुन येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी रोशन विजय उगले याचे विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होता. सदर सत्र खटल्यामध्ये आरोपी रोशन विजय उगले ह्याचेवरील गुन्हा सिद्ध करणे करिता अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जी. डी. गंगावणे यांनी न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली. सदर सत्र खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरोपीचा पुतण्या, आरोपीचा चुलत भाऊ, आरोपीची काकू आरोपीचा शेजारी हे न्यायालयात पूर्णपणे फितूर झाले होते. परंतु न्यायालयाने उर्वरित साक्षदार श्रीकृष्ण वाकोडे, अंजु दिनेश वाकोडे, निकेश गावंडे, अशोक नारायण महाकाळ, ई. साक्षादर तसेच वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, व इतर महत्वाचे साक्षदार रासायनिक विश्लेषक, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा अमरावती अभिषेक तडे व पंकज हुलवान तसेच नोडल अधिकारी आयडिया-ओडाफोन व रिलायन्स जिओ टेलिकॉम ह्यांची साक्ष ग्राह्य धरून व परिस्थितीजन्य पुरव्यावरून व रासायनिक पुराव्यावरून आरोपी रोशन विजय उगले रा. मानोली ह्याला त्याची पत्नी रिना हिच्या खुनाच्या गुन्ह्यात दोषसिद्धी झाल्यामुळे ५ मार्च २०२६ रोजी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे आजन्म कारावास (जन्मठेप) व १० हजार रुपये दंड व दंड भरण्यात कसूर केल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.