वॉशिंग्टन,
americas-new-target सध्या इराण आणि इस्रायल- अमेरिकेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. त्यांच्या मते, “आमचे पहिले प्राधान्य इराणसोबत सुरू असलेला संघर्ष यशस्वीपणे संपवणे आहे, आणि हा विषय मार्गी लागल्यानंतर अमेरिका आपले लक्ष क्युबाकडे वळवेल.” हे विधान त्यांनी इंटर मियामी फुटबॉल क्लब च्या विजयानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात केले.

ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईबाबत प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायल ठरवलेल्या वेळापत्रकापेक्षा कितीतरी वेगाने इराणची लष्करी ताकद नष्ट करत आहेत. गेल्या ७२ तासांत अमेरिकेने इराणच्या २४ युद्धनौका समुद्रात बुडवल्या आहेत. यामुळे इराणचे नौदल पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत आले असून हवाई दल जवळपास निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे त्यांचे लढाऊ विमान आता उडण्याच्या स्थितीत नाहीत, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आता खिळखिळी झाली असल्याने अमेरिकन विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय इराणच्या आकाशात वावरू शकतात. ट्रम्प यांच्या मते, इराणला समजले आहे की ते अमेरिकेसमोर टिकू शकत नाहीत. americas-new-target सातत्याने इराणकडून युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अमेरिकेच्या अटी पूर्ण न झाल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
इराणवरील लष्करी मोहिमेनंतर ट्रम्प सरकार क्युबाकडे लक्ष वळवेल. मियामीमध्ये क्युबन-अमेरिकन समुदायाची मोठी उपस्थिती असल्याने हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. क्युबा सध्या अमेरिकेशी तडजोड करण्यास इच्छुक असून, भविष्यात तिथले अनेक निर्वासित नागरिक सन्मानाने आपल्या देशात परत येऊ शकतील, असे ट्रम्प यांनी सांगितले. americas-new-target ट्रम्प यांच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जगाचे लक्ष इराणनंतर क्युबाबाबत ट्रम्प सरकारने उचलेली पावले कोणती ठरतील, याकडे लागले आहे.